LSC आयोजित जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न!
लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह (LSC) आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने दि. ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत एससीईआरटीचे उपसंचालक डॉ. विकास गरड आणि एसएमएफचे सीईओ श्री. विशाल फणसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी एससीईआरटीचे प्रतिनिधी आणि सहा जिल्ह्यातील डायटच्या तज्ज्ञांनी मूल्यांकन साधनसंचांवर अभिप्राय दिले. लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह यांच्या सहयोगाने किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि शिक्षकांच्या जीवन कौशल्यविषयक तयारीचे मापन करण्यासाठी विविध मूल्यांकन साधनसंच विकसित केले आहेत. त्याच्या प्रमाणिकरणासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती.