Posts

Showing posts with the label #ValueEducation

पुन्हा शाळेची घंटा वाजण्याची मुले पाहताहेत आतुरतेने वाट!

Image
  'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?'   शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती.   शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.   विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑग...

ग्रामीण भागातील मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्याची गरज!

Image
  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ठप्पे झाले आहे .  हे संकट आणखी कमी झालेले नाही. भारतात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दोन वेळा लॉकडाउन करावा लागला. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोनाचे दुष्परिणाम सर्वांना सहन करावे लागत आहेत. त्यापासून लहान-मोठे, स्त्री-पुरुष, विद्यार्थी-शिक्षक असे कोणीही सुटू शकले नाही. करोनाची समस्या ही फक्त आरोग्याची समस्या नसून ही शैक्षणिक समस्याही बनली आहे, असे तज्ज्ञ सांगतात. मागील दीड वर्षांपासून शाळा, कॉलेज बंद आहेत. अनेकांचे शिक्षण बंद झाले आहे. साहजिकच मुलांवर भावनिक , शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होऊन शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . पुन्हा शाळा पूर्ववत कधी सुरु होतील , हे निश्चित नाही .   या काळात फक्त ऑनलाइन माध्यमाद्वारे शिक्षणावर भर देण्यात येत आहे. पण भारतासारख्या खंडप्राय देशात ऑनलाइन शिक्षण हा काही सशक्त पर्याय असू शकत नाही. अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. लॅपटॉप, टॅब, स्मार्ट फोन अशी साधने ग्रामीण भागात अत्यल्प आ...