गौखेल ग्रामपंचायतीचा समाजासमोर नवा आदर्श; शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा ठराव
गौखेल, जि. बीड : कोरोनामुळे आठ-नऊ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशन ने एक आशेचा किरण दाखवला. तो अर्थातच ‘सहयोगी शिक्षण अभियान.' मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत गावात 'समाज विद्या केंद्र' सुरू करावे. त्यासाठी लागणारी जागा व शिकवण्यासाठी शिक्षण सारथींची निवड करावी. हे सर्व सामाजिक कार्य असल्याने यासाठी शासन किंवा संस्थेकडून कोणताही निधी देण्यात येत नाही. गौखेल येथील सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या समाज विद्या केंद्रातील मुलांना मास्कचे वाटप करताना तालुका समन्वयक मंगल शेकडे. सरपंचांच्या प्रस्तावानंतर आवश्यक सर्व बाबींची पडताळणी करून १ ऑक्टोबर २०२० पासून १६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या अभियानाला सुरुवात झाली. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यातील १०५ समाज विद्या केंद्रावर १९०४ विद्यार्थी रोज शिकायला येतात. मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, विस्कळीत झालेली शैक्षणिक परिस्थिती पूर्ववत करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. गावातीलच ...
Comments
Post a Comment