काटोल व नरखेड तालुक्यात सहयोगी शिक्षण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व माजी आमदार मा. डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने व व्हीएसपीएम अकॅडमी फॉर हायर एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोगी शिक्षण अभियान काटोल व नरखेड तालुक्यात राबविण्यात येत आहे.
दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी काटोल येथे समाज विद्या केंद्र चालविण्यासाठी निवडलेल्या गावातील शिक्षण सारथींचे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दोन दिवसांत दोन्ही तालुक्यात अनेक समाज विद्या केंद्रे सुरु झाली आहेत.
केंद्रात दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व सारथींना उपक्रम पुस्तिकांचे व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण होताच अशा पद्धतीचा त्वरित प्रतिसाद पाहण्यास मिळणे ही एक लक्षणीय आणि आनंददायी बाब आहे.





Comments
Post a Comment