'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती. शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑग...
Comments
Post a Comment