Posts

LSC आयोजित जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न!

Image
लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह (LSC) आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने दि. ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत एससीईआरटीचे उपसंचालक डॉ. विकास गरड आणि एसएमएफचे सीईओ श्री. विशाल फणसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी एससीईआरटीचे प्रतिनिधी आणि सहा जिल्ह्यातील डायटच्या तज्ज्ञांनी मूल्यांकन साधनसंचांवर अभिप्राय दिले. लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह यांच्या सहयोगाने किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि शिक्षकांच्या जीवन कौशल्यविषयक तयारीचे मापन करण्यासाठी विविध मूल्यांकन साधनसंच विकसित केले आहेत. त्याच्या प्रमाणिकरणासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती.  

पुन्हा शाळेची घंटा वाजण्याची मुले पाहताहेत आतुरतेने वाट!

Image
  'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?'   शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती.   शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.   विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑग...

#मूल्यवर्धन | जोडी चर्चेद्वारे 'शाळेत आम्ही हे शिकतो' उपक्रम

Image

सहयोगी शिक्षण अभियान : कोविड काळात शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची शैक्षणिक चळवळ

Image
कोरोना काळात शाळा बंद होत्या, अशावेळी प्रश्न होता तो मुलांच्या शिक्षणाचा. हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम पोहोचविणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचा या काळात शिक्षण पर्यायांवर अभ्यास सुरू होता. यातूनच उदयास आला 'सहयोगी शिक्षण अभियान' हा उपक्रम. कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या यवतमाळ जिल्ह्यातील 'सतपल्ली' गावातील सहयोगी शिक्षण अभियान या उपक्रमाबद्दल.   कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता. या संसर्गाचा समाजातील विविध घटकांवर परिणाम झाला, यापैकी एक घटक म्हणजे विद्यार्थी. शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. शासनाने ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ उपक्रम राबवून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हते, तर काही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही अशा समस्यांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. अशातच देशभरातील विविध राज्यात मूल्यवर्धनवर उल्लेखनीय काम केलेल्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने ‘सहयोगी शिक्षण अभ...
Image
विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा आणि नदीच्या पाण्यासारखं निरतंर प्रवाहित रहा! #shantilalmutthafoundation #SMF #Education #Educational #Student #Teacher #teachersofinstagram #teaching #learning #teachingideas #elearning #moraleducation #creativity #ValueEducation #Values #India #school #maharashtra #igo #ngoindia #ngos #indiagram #studentsuccess #studentsofinstagram #studentsgram #welfare #शाळा #मूल्यवर्धन  

कागद, टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू बनविल्या

Image

मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे क्षमतांची जाणीव झाली

Image